माझा ग संवसार सोन्याचा झाला
आलीया माझ्या घरी ग खरच येडु सरी ग
तीन देव्हारी रहीवास केला
माझा ग संवसार सोन्याचा झाला ||धृ||
सासू सासरे दीर नणंद
त्याना येडूचा लागलाय छंद
सार घरदार भक्तीत धुंद
दरवळे आनंदी आनंद
कुलवंताची नार भाग्यान मिळालं सार
मग जागीन मी वचनाला
माझा ग संवसार सोन्याचा झाला ||१||
माझ्या पतीन ऐकलं माझं
चाले येरमाळ्याला मी आज
तीथ घालीन कवड्याचा साज
तिच्या दारी कशाची लाज
हाळद मानापानाची आवड मला बी गाण्याची
माथा ठेवीन तिच्या चरणाला
माझा ग संवसार सोन्याचा झाला ||२||
घरी प्रसादाची बोळवनी
करीन पुरणपोळी गुळवणी
परड्या भरून देवीची आळवणी
आनुन आराधी करून विनवनी
चंदन मोना भाऊ ग त्यांची गाणी गाऊ ग
मला येडूचा अनुभव आला
माझा ग संवसार सोन्याचा झाला ||३||
0 Comments