तुझ गाण  गाता गाता  तुझ्या पायरीवर बसाव  

 गायक :- साजनजी बेंद्रे  

tujh gaan gatha gaatha tuzya payrivar basav || marathi songs lyrics 


 <तुझा भक्त मी.. नाही लबाड ग

होऊनी भिकारी बसलो पायरीला
काही तरी..वाढ ग ...

पुढच्या जन्मी वाटे मला भिकारी असावं
तुझं गाण गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं
गाण गात गात तूझ्या पायरीवर बसावं.   || धृ||

हे कुणी वाढलं जोगवा मला कुणी वाढलं दान
जे काही मिळल माझं त्यात समाधान
हे कुणी वाढलं जोगवा मला कुणी वाढलं दान
जे काही मिळल माझं त्यात समाधान
रोज तूला पाहावं नशीबी कुणाच्या असावं
रोज तूला पाहावं नशीबी कुणाच्या असावं
तुझं गाण गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं
गाण गात गात तूझ्या पायरीवर बसावं.  ||१||

हे श्रीमंती आली तरी मी माजणार नाही
भिकारी तू केलं तरी लाजणार नाही
हे श्रीमंती आली तरी मी माजणार नाही
भिकारी तू केलं तरी लाजणार नाही
तुझ्या जवळ जगाया कसलं भांडवल नसावं
तुझ्या जवळ जगाया कसलं भांडवल नसावं
तुझं गाण गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं
गाण गात गात तूझ्या पायरीवर बसावं.    ||२||

हे किती जणांनी माझं वाटोळ ग केलं
तुझ्या मुळ माझं फक्त मंगल झालं
हे किती जणांनी माझं वाटोळ ग केलं
तुझ्या मुळ माझं फक्त मंगल झालं
हुकमाचा एक्का साजन त्याला किती पण पिसाव
हुकमाचा एक्का साजन त्याला किती पण पिसाव
तुझं गाण गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं
गाण गात गात तूझ्या पायरीवर बसावं.

पुढच्या जन्मी वाटे मला भिकारी असावं
तुझं गाण गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं
गाण गात गात तूझ्या पायरीवर बसावं

 

Post a Comment

4 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)